शिक्षण

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्र.१२ हैदर बाग येथे मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रम

 

नांदेड : दि. 17 – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 12, हैदर बाग येथे मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना शालेय जीवनात अधिक स्वावलंबी बनवणे हा होता.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय शिक्षणाधिकारी श्री. व्यंकटेश चौधरी (शिक्षण विभाग, मनपा नांदेड) यांनी हजेरी लावली. तसेच श्री. संदीप लबडे सर व श्री. ढवळे सर यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजापटेल अब्दुल मुतल्लीब यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षणाधिकारी श्री. व्यंकटेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. अनेक मुली अंतर दूर असल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. मोफत सायकल वाटपामुळे त्यांना शाळेत नियमितपणे उपस्थित राहता येईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल. विद्यार्थिनींनी शिक्षणाची कास धरून उज्ज्वल भविष्य घडवावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास करणे सुलभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी मदत मिळेल. पालक आणि विद्यार्थिनींनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजीया तबस्सूम यांनी केलं व या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका महेजबीन बेगम व निखत परवीन यांनी खूप प्रयत्न केला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *