महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचा सक्रिय सहभाग आयटीआय येथे मिनरल पाणी बॉटल वाटप करणार

नांदेड, 22- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चात नांदेडच्या बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन संस्थेचा सक्रीय सहभाग असून, आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने 25 मार्च रोजी नांदेड येथे मोफत मिनरल पाणी वाटप करण्यात येणार आहे.
हे पाणी वाटप शहरातील आयटीआयजवळ महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ होणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, पत्रकार दत्ताहरी धोत्रे, बाबूराव कसबे, संजय नरवाडे, डॉ. राम वाघमारे, मिलिंद चावरे, किशन फोले, रवी लोहाळे, भालचंद्र जोधळे, अशोक दामोधर, नंदकुमार बनसोडे, मिलिंद व्यवहारे, भगवान गायकवाड, किशोर आटकोरे, चंद्रमणी कांबळे यांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या अनुयायासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम असून, नांदेडमधील बौद्ध समाज व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



