राजीव गांधी महाविद्यालयात शहीद दिन साजरा अर्धापूर:- उध्दव सरोदे –

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शहीद दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.टी.शिंदे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग,राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मर्णार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो.२३ मार्च रोजी इंग्रजांनी भगत सिंग,राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती.
त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली व त्या मुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याश्या आयुष्यात वैचारिक क्रांतिची ज्योत पेटवली तर भगतसिंग यांच्या विचारांनी आजही तरुण प्रभावीत आहेत.भगतसिंगांची लढाई ही केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती.
ब्रिटीशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते असे प्रतिपादन केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रकाश कोथळे, प्रा.डॉ.बाळासाहेब नरवाडे,प्रा.डॉ. अर्जुनसिंह ठाकूर, प्रा.डॉ.शिवराज कदम,प्रा.डॉ.संदीप कोरडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर.बी.कोटलवार,श्री डी.सी.इंगोले, संदीप गाढे हे उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर. बी.कोटलवार यांनी केले तर आभार डॉ.शिवराज कदम यांनी मानले.



