हेल्थ

अशोक नगर येथे तायक्वांदो कोरियन कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन….

केंद्र शासनाच्या युवा व खेळ मंत्रालय अंतर्गत नांदेड जिल्हा तायक्वॉदो संघटनेच्या वतीने 1 एप्रिल ते 30 एप्रिल2025 दरम्यान मास्टर तायक्वांदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे एका महिन्याचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा नांदेड मधील विद्यार्थी युवक युवतीने लाभ घेण्याचे आयोजन संघटनेतर्फे करण्यात आले आहे .

ऑलम्पिक मध्ये खेळला जाणारा तसेच जगभरातील सर्व संरक्षण दलासह भारतात सर्व विभागात नोकरी आरक्षणात असणारा सर्वोत्तम संरक्षण खेळ प्रकार तायक्वांदोचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध चार बॅचेस मध्ये देण्यात येणार आहे स्वसंरक्षणासह शालेय , जिल्हा , राज्य ,राष्ट्रीय स्पर्धेत तसेच सीबीएससी स्पर्धेत ,ऑलम्पिक ट्रायल स्पर्धेत ,खेलो इंडिया स्पर्धेसह तायक्वॉदो पोलीस स्पर्धा ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी स्पर्धेत सहभाग नोंदवीत नोकरीचे 5% आरक्षणासह महाराष्ट्र शासनातर्फे इतरही सुविधांचा लाभ पाल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय तायक्वॉदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे .

प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना राज्य राष्ट्रीय स्पर्धेसाठी या शिबिरातून निवडण्यात येणार आहे . अधिक माहितीसाठी नांदेडकरांनी अशोक नगर नांदेड येथे तायक्वॉदो प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदणी करावी अन्यथा 94 20 67 33 94 या भ्रमणध्वनीवर संपर्क करून नोंदणी करावी अशे कळविण्यात आले आहे .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *