Uncategorized

प्रभाग क्रमांक 13 मधील सी.सी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा. माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या प्रयत्नाला अखेर यश.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मधील बिलाल नगर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता हा अतिशय रहदारीचा अपघातग्रस्त झालेला होता. सदरील रस्त्यावर दुचाकी,शाळेतील विद्यार्थी,वयस्कर नागरिक,मरघाटला जाणाऱ्या मयेतचे नागरिक तसेच गुरुद्वारा असल्यामुळे नागरिकांचा फार मोठा रहदारीचा हा रस्ता आहे.

सदरील रस्त्याला 100 कोटीची निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर अर्धा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. तथापि प्रभाग क्रमांक 13 मधील बिलाल नगर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंतच्या रस्ता हा मनपा निधी अंतर्गत सि.सि रस्ता हा तात्काळ करण्यात यावा या संबंधित नांदेड नगरीचे माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी गेल्या अनेक वर्षापासून नांदेड मनपाचे आयुक्त व तसेच नांदेड मनपाचे कार्यकारी अभियंता यांना अनेक निवेदने सादर केले व तसेच उपोषण आणि आंदोलन करण्यचे इशारे सुद्धा दिले.

या सर्व पाठपुराव्याची नांदेड मनपा नीं दखल घेऊन अखेर त्या कामाला सुरुवात करण्यात आली.चालु असलेल्या कामाची पाहणी नांदेड नगरीचे माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी केली यावेळी प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभागातील सर्व नागरिकांनी माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांचं कौतुक केलं.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *