हेल्थ

आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचवा- सीईओ मेघना कावली

 

नांदेड, 2- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्या विविध योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. त्यांनी आज यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माता-बाल संगोपन, लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि अन्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे आवाहन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, प्रशासकीय अधिकारी नीमलवार, सांख्यिकी अधिकारी डुबुकवाड, आयुष अधिकारी डॉ. मुरमुरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या विविध योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रभावी उपाययोजना करण्यात. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचवावा, अशीही त्यांनी सूचना केली.

यावेळी त्यांनी माता-बाल संगोपन, लसीकरण, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण (हिवताप, हत्तीरोग) कार्यक्रम, साथरोग नियंत्रण, सुमन योजना, एनकास, काया कल्प, आरोग्य संस्थांचे बांधकाम, पाण्याच्या स्रोतांची तपासणी, सिकलसेल तपासणी, राष्ट्रीय बाल सुरक्षा, किशोरवयीन सुरक्षा, असंसर्गजन्य व संसर्गजन्य आजार नियंत्रण, तसेच बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर दिला. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *