काचीगुडा-नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेसमध्ये तीन आरक्षित डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली आहे

दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून काचीगुडा-नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेस मध्ये एक आरक्षित वातानुकुलीत खुर्चीयान (AC चेयर कार) आणि दोन दुसऱ्या श्रेणीची आरक्षित खुर्ची यान (चेयर कार) डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे–
1. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस:
दिनांक 07 एप्रिल, 2025 ला काचीगुडा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस मध्ये एक आरक्षित वातानुकुलीत खुर्ची यान (AC चेयर कार) आणि दोन आरक्षित दुसऱ्या श्रेणीची खुर्ची यान (चेयर कार) डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचे ठरविले आहे.
2. गाडी क्रमांक 17662 नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेस :
दिनांक 08 एप्रिल, 2025 ला नगरसोल येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 17662 नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेस मध्ये एक आरक्षित वातानुकुलीत खुर्ची यान (AC चेयर कार) आणि दोन आरक्षित दुसऱ्या श्रेणी ची खुर्सी यान (चेयर कार) डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचे ठरविले आहे.
3. या गाडीच्या डबे वाढी नंतर या गाडी मध्ये 17 जनरल, 02 आरक्षित दुसऱ्या श्रेणी ची खुर्ची यान (चेयर कार), एक आरक्षित वातानुकुलीत खुर्ची यान (AC चेयर कार) आणि दोन एसएल आर आसे एकूण 22 डबे असतील.
4. या गाडीचे आरक्षण दिनांक 05.04.2025 पासून उपलब्ध होईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
5. गाडीच्या वेळापत्रकात कोणताच बदल करण्यात आला नाही



