शिक्षण

राजीव गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे भूगोल विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिडको नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्याल यातील भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.नामदेव वाघमारे होते.यावेळी व्यासपीठावर प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे,प्रा.डॉ.भागवत पस्तापुरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी.कोटलवार होते.

प्रा.डॉ.नामदेव वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यास केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आलेला आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या सर्व कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षीत प्रवेश घेताना मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट कसा निवडावा याबद्दल सविस्तर माहिती दिली.भूगोल हा विषय प्रात्यक्षिक विषय आहे.अलीकडील काळात प्रात्यक्षिक विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे कारण प्रात्यक्षिक विषयात विद्यार्थी कौशल्य आत्मसात करतो आणि त्याला त्याचा भविष्यात खूप फायदा होतो.विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून आपलं भविष्य सफल करावे असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्याल याचे प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागरूकता कार्यक्रम भूगोल विभागाने राबवला याबद्दल भूगोल विभागाचे व सर्व प्राध्यापकाचे अभिनंदन केले.जागरूकता होणे ही काळाची गरज आहे.वर्ष 2020 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वर्ष २०२४-२५ पासून शैक्षणिक धोरण लागू केले आहे.

येणाऱ्या काळात विद्यार्थ्याला या विषयाची सविस्तर माहिती असावी,विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडावा याविषयी काळजीपूर्वक अभ्यास करून आपला विषय निवडावा असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी. कोटलवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.बालाजी जाधव यांनी करून आभार प्रा.डॉ.मारोती देशमुख यांनी मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *