शहर

नांदेड शहरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम – ३८९ प्रकरणांवर कारवाई, ५.३० लाखांचा दंड वसूल

नांदेड, ११ एप्रिल २०२५ : शहरातील वाढत्या वाहतूक अडचणींच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांच्यावतीने अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना चालणारी वाहने, तसेच गणवेश न घालणाऱ्या अॅटोचालकांविरोधात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण ३८९ प्रकरणांवर कारवाई करून तब्बल ₹५,३०,७००/- इतक्या रकमेचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली. शहर वाहतूक शाखा वजिराबादचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली वजिराबाद चौक, रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट आणि कलामंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये खालीलप्रमाणे कारवाई झाली:

  • ट्रिपल सीट प्रकरणे – २१ (₹२१,००० दंड), गणवेश न घालणारे अॅटोचालक – ५२ प्रकरणे (₹४४,००० दंड), अनपेड प्रकरणे – १९५ (₹३,३०,२५० दंड), ई-चलनाद्वारे भरलेले प्रकरणे – ११ (₹८,२५० दंड), ऑनलाइन चलन प्रकरणे – ७ (₹१४,९५० दंड)

एकूण: २८६ प्रकरणे, ₹४,१८,४५० दंड

दुसऱ्या टप्प्यात, इतवारा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ पवार यांनी देगलूर नाका, जुना मोंढा आणि बाफना टी पॉइंट परिसरात धडक तपासणी करत १०३ प्रकरणांवर कारवाई करून ₹१,१२,२५०/- दंड वसूल केला.

या संयुक्त मोहिमेअंतर्गत शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी मिळून एकूण ३८९ प्रकरणांवर कारवाई करून ₹५,३०,७००/- इतका दंड वसूल केला.

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून, नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *