शहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किट वाटप सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांचा अभिनव उपक्रम

 

नांदेड,१४- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांच्या वतीने दिव्यांग कुटुंबांना एक महिन्याचे जीवनावश्यक धान्य किट वाटप करण्यात आले.
हा उपक्रम नांदेड येथील संत गाडगेबाबा चौकाजवळील साई मंदिर परिसरात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

नांदेड शहरातील अधिक विविध दिव्यांग व्यक्तींना एक महिना पुरेल इतके राशन किट वाटप करून सुरज सोनेकर यांनी सामाजिक भान जपत एक वेगळा पायंडा पाडला. या प्रसंगी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, जयस्वाल मॅडम, गोल्डन मॅन शंकपाळ, रवी लोहाळे मुखेडकर, परमेश्वर दीपके यासह आदींची उपस्थिती होती. सामाजिक एकोपा व सहकार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *