शहर

प्रामाणिक रिक्षाचालकाची कौतुकास्पद कृती – हरवलेला मोबाईल परत करत समाजासमोर ठेवले आदर्श

नांदेड, १२ एप्रिल २०२५ : हल्लीच्या काळात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चालला असतानाही समाजामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या आपल्या प्रामाणिकतेमुळे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतात. अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली असून, टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे दक्षिण शहर उपाध्यक्ष पिंटू गजभारे या रिक्षाचालकाने आपल्या प्रामाणिकतेचा दाखला देत हरवलेला मोबाईल मालकाला परत करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

घटना अशी की, ममता वाघमारे (रा. धनेगाव, नांदेड) या नेहरू कॉलेजच्या विद्यार्थिनीने धनेगाव-लातूर फाटा ते नेहरू कॉलेज हा प्रवास पिंटू गजभारे यांच्या रिक्षातून केला. प्रवासादरम्यान मोबाईलवर बोलताना त्यांनी आपला रिअलमी कंपनीचा १६,००० रुपये किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरून ठेवला. घरी पोहोचल्यावर मोबाईल हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलवर कॉल केला.

प्रामाणिक रिक्षाचालक पिंटू गजभारे यांनी फोन उचलला आणि मोबाईल सापडल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) बागवाले यांना यासंदर्भात कळवले. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने पिंटू यांनी सांगितले की मोबाईल सुरक्षित आहे आणि त्यांनी स्वतः सिडको परिसरातून फोन करून विद्यार्थिनीला आश्वस्त केले.

यानंतर मोबाईल परत देण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांना माहिती देण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल विद्यार्थिनीला परत करण्यात आला.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी रिक्षाचालक पिंटू गजभारे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला अध्यक्ष अहमद (बाबा) बागवाले, प्रदेश उपाध्यक्ष शेख तय्यब, जिल्हाध्यक्ष शेख अहमद, साजिद राज, तसेच संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ही घटना नांदेडकरांसाठी प्रेरणादायी असून, रिक्षाचालक पिंटू गजभारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रामाणिकपणाचे हे उत्तम उदाहरण समाजातील विश्वास अधिक दृढ करणारे ठरले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *