रद्द करण्यात आलेली अमरावती-तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस पूर्ववत करण्यात आली आहे, मार्ग बदलून धावणार

गुंटकल विभागातील धर्मावरम स्थानकावर यार्ड परिवर्तन चे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.
या कार्यालयाने दिनांक 16.04.2025 रोजी दिलेल्या प्रेस नोट क्रमांक 743 नुसार अमरावती-तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस दिनांक 05, 08, 12 आणि 15 मे आणि दिनांक 06, 10, 13 आणि 17 मे, 2025 रोजी रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. या निर्णयात आता बदल करण्यात आला आहे.
नवीन निर्णयानुसार हि रद्द करण्यात आलेली गाडी पूर्ववत करण्यात आली आहे.
अमरावती-तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस नियमित वेळापत्रकानुसार मार्ग बदलून धावेल. तारखेत झालेला बदल लक्षात घ्यावा हि विनंती .
मार्ग बदलून धावणारी गाडी :
1. गाडी संख्या 12766 अमरावती – तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 08, 12 आणि 15 मे, 2025 रोजी मार्ग बदलून धोणे जंक्शन, गुत्ती, रेनुगुंठा, आणि तिरुपती मार्गे धावेल. हि गाडी अनंतपूरम, धर्मावरम, कादिरी, मांडण्पल्ले रोड, पिलर, पकाला या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.
2. गाडी संख्या 12765 तिरुपती – अमरावती एक्स्प्रेस दिनांक 06, 10, 13 आणि 17 मे, 2025 रोजी रोजी मार्ग बदलून तिरुपती, रेनुगुंठा, गुत्ती आणि धोणे जंक्शन मार्गे धावेल. हि गाडी पकाला, पिलर, मांडण्पल्ले रोड, कादिरी, धर्मावरम, अनंतपूरम या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.



