उन्हाचा तडाखा असह्य गरमीपासून बचावासाठी पाण्याच्या टाकीतच थंडावा शोधणाऱ्या बालकांची अनोखी शक्कल!
लोहा (प्रतिनिधी) – सध्या लोहा तसेच संपूर्ण नांदेड जिल्ह्यात प्रचंड उकाड्याचे वातावरण निर्माण झाले असून तापमानात सतत वाढ होत आहे. हवामान विभागाने नांदेडसाठी तीन दिवसांसाठी ‘हिटवेव्ह अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत.
गरमीचा कडाका इतका वाढला आहे की, आता बच्चेकंपनी सुद्धा आपल्या पद्धतीने थंडावा शोधत आहेत. लोह्यातील काही लहान मुलांनी उन्हापासून वाचण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीतच बसण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या अनोख्या दृश्याने परिसरातील लोकांचे लक्ष वेधले असून बालकांच्या या शक्कलचे कौतुकही होत आहे.
एकीकडे लहान मुले पाण्यात थंडावा शोधत असताना, दुसरीकडे डॉक्टर आणि प्रशासन यांनी नागरिकांना उन्हापासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडणे, भरपूर पाणी प्यावे, थंड पेये व फळांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. छायाचित्र – विनोद महाबळे



