स्पोर्ट्स

नांदेड जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेच्या हस्तांतरणाची मागणी

अन्यथा २५ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा संकुलासाठी असरजन, कौठा येथे मंजूर झालेली २५ एकर जागा त्वरित जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अन्यथा दिनांक २५ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा तीव्र इशारा नांदेड ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष व पोलीस कराटे प्रशिक्षक विक्रांत खेडकर यांनी दिला आहे.

आज दि. २१ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पालकमंत्री मा. अतुल सावे यांची भेट घेऊन या मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात महासचिव बालाजी पाटील जोगदंड, डॉ. रमेश नांदेडकर, ज्ञानेश्वर सोनसळे, गोविंद पांचाळ, विनोद गोस्वामी, संजय चव्हाण, राष्ट्रपाल नरवाडे यांच्यासह अनेक क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात स्वतंत्र क्रीडा संकुल किंवा उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही नांदेडमधील खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत, ही बाब अत्यंत गौरवाची असून, क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने ही जागा अत्यावश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

या संदर्भात तत्कालीन मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून कौठा येथे २५ एकर जमीन मंजूर करण्यात आली होती, मात्र ३ वर्षांपासून ती फाईल मंत्रालयात धूळ खात पडून आहे. त्यामुळे या जागेचा तातडीने निर्णय घेऊन ती क्रीडा संकुल समितीला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी डॉ. राहुल वाघमारे, जनार्दन गोपिले, जयपाल रेड्डी, रमण बैनवाड, प्रलोभ कुलकर्णी, वृषाली पाटील जोगदंड, राजेश जांभळे, जसविंदरसिंग रामगडिया, अजगर अली पटेल, मनोज जोशी, डॉ. दिलीप भडके, नवनाथ पोटफोडे, इमरान खान, मधुकर क्षीरसागर, विष्णू पुरणे यांनीही या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

पालकमंत्र्यांनी या मागणीची तातडीने दखल घ्यावी आणि क्रीडा संकुलाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *