शहर

नांदेडमध्ये बाफना टी-पॉईंट ते माळटेकडी मार्गावरील अवैध अतिक्रमणावर धडक कारवाई – 140 अतिक्रमण हटवले

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरीकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड पोलीस प्रशासन व वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली.

ही कारवाई बाफना टी-पॉईंट ते देगलूर नाका ते माळटेकडी या मुख्य मार्गावर करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक, तसेच पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. कारवाईदरम्यान एकूण 140 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यात गाड्या, फलक, बॅनर व स्टॉल्स यांचा समावेश होता.

महानगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले असून पाच आयशर वाहनांमध्ये सामान जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचे उप-आयुक्त श्री. संधू, सहाय्यक आयुक्त श्री. सोनसळे, तसेच 06 अधिकारी व 50 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

पोलीस विभागाकडून राज्य राखीव पोलीस दलाचे 2 प्लाटून, दंगल नियंत्रण पथकाचे एक प्लाटून, 10 होमगार्ड, तसेच 5 अधिकारी आणि 20 अंमलदार उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक मा. अभिनाश कुमार यांनी सांगितले की, अवैध अतिक्रमणविरोधी ही मोहीम पुढेही सातत्याने राबवली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोणताही वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा अतिक्रमण न करता कायद्याचे पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *