शहर

नांदेड शहरात अवैध प्रवासी वाहतूक व नियमभंग करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई – ३,६९,३५०/- रुपयांचा दंड वसूल

नांदेड (प्रतिनिधी): शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांच्या संयुक्त पथकांनी दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना/परमिट वाहने, गणवेश न परिधान करणारे अॅटोचालक, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.

या मोहिमेमध्ये एकूण ३४८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३,६९,३५०/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वजिराबाद वाहतूक शाखेची कारवाई (प्रभारी अधिकारी – श्री. साहेबराव गुट्टे):

पेड केसेस – १८: ₹६,६००, ऑनलाईन युपीआय केसेस – ८: ₹६,२५०, अनपेड केसेस – १३३: ₹१,८३,५००, ट्रिपल सीट वाहन – ६: ₹६,०००, गणवेश न परिधान करणारे अॅटोचालक – ५७: ₹४८,५००, एकूण केसेस – २२२ | एकूण दंड – ₹२,५०,८५०

इतवारा वाहतूक शाखेची कारवाई (प्रभारी अधिकारी – श्री. राजकुमार हिंगोले):

देगलूर नाका, जुना मोंढा, बर्की चौक परिसरात तपासणी, एकूण १२६ प्रकरणांवर कारवाई, दंड – ₹१,१८,५००/-

एकूण संयुक्त कारवाई:

प्रकरणे – ३४८, एकूण दंड – ₹३,६९,३५०/

सदर मोहिमेस मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव यांचेही मार्गदर्शन लाभले. या कारवाईमध्ये शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा, तसेच दंगल नियंत्रण पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.

नांदेड पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *