महाराष्ट्राच्या आदिबा अनम अश्फाक अहमद यांची UPSC 2024 मध्ये घवघवीत यश
देशात 142 वी रँक; IAS होण्याची पूर्ण शक्यता, मुस्लिम महिलांसाठी प्रेरणास्त्रोत

आज जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2024) अंतिम निकालात महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशभरातून 142 वी रँक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे ती महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम IAS अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहे.

यापूर्वी आदिबाने UPSC ची मुलाखत दिली होती, मात्र अंतिम निवड झाली नव्हती. परंतु सातत्य, चिकाटी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर यावेळी तिने अंतिम यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
अभ्यासाचा प्रवास:
-
आदिबा हिने हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था तसेच जामिया रेसिडेन्शियल कोचिंग सेंटर मधून मार्गदर्शन घेतले. तिच्या अभ्यासातील सातत्य आणि स्वतःवरील विश्वास हाच तिच्या यशामागचा खरा आधार आहे.
प्रेरणादायी यश:
आदिबाच्या या यशामुळे मुस्लिम महिला विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणास्थान निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीतील विद्यार्थिनीही कठोर परिश्रम आणि योग्य दिशादर्शनाच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये स्थान मिळवू शकतात, हे तिने सिद्ध केले आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा:
आदिबा अनम हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तिच्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “स्वप्न पहा, ध्येय ठरवा आणि त्यासाठी झटत राहा – यश नक्की मिळते!” – आदिबा अनमच्या यशाची खरी शिकवण.
यशस्वी मुस्लिम उमेदवारांची यादी
1)रँक 40: इरम चौधरी
2)रँक 67: फरखंदा कुरेशी.
3)रँक 131: मोहम्मद मुनीब भट.
4)रँक 142: अदिबा अनम अशफाक अहमद.
5)रँक 281: वसीम उर रहमान.
6)रँक 292: मोहम्मद नायब अंजुम.
7)रँक 314: मोहम्मद हारिस मीर.
8)रँक 345: मोहम्मद शौकत अझीम.
9)रँक 417: आलिफा खान
10)रँक 442: नजमा ए. सलाम.
11)रँक 506: शकील अहमद.
12)रँक 553: शाह मोहम्मद इम्रान मोहम्मद इरफान.
13)रँक 560: मोहम्मद आफताब आलम.
14)रँक 585: मोहसीना बानो.
15)रँक 594: सय्यद मोहम्मद आरिफ मोईन.
16)रँक 643: हसन खान.
17)रँक 660: घांची गजाला मोहम्मद हनीफ.
18)रँक 711: मुहम्मद सलाह टी. ए.
19)रँक 742: सदफ मलिक
20)रँक 768: यासर अहमद भट्टी
21)रँक 791: रियाझ वॉटसन जे.
22)रँक 815: जावेद मेवाती.
23)रँक 818: पीरजादा मोहम्मद उमर.
24)रँक 847: नजीर अहमद बिजरान.
25)रँक 993: अर्शद अजीज कुरेशी.
26)रँक 998: इकबाल अहमद.



