शिक्षण

नांदेड : मनपा शाळा क्र. १३ मध्ये दहा मुलींना सायकल वाटप

 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वाघाळा महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १३, महबूबिया कॉलनी येथे महानगरपालिका महिला, बालकल्याण व शिक्षण समितीतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात दहा विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. या सायकल वाटपाचा उद्देश मुलींच्या शिक्षणातील प्रवास सुलभ करणे, शाळेत नियमितपणे हजेरी वाढवणे आणि शिक्षणात अधिक गती येणे हा आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी श्री. व्यंकटेश चौधरी साहेब व उपाध्यक्ष शालेय समिती मुक्तार खान साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. शेख अब्दुल रहीम सर, माजी मुख्याध्यापक श्री. अब्दुल अजीम सिद्दीकी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहनदायक ठरला असून शाळेत आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास हातभार लागेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाबद्दल सर्व सहभागी अधिकारी, शिक्षक व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *