राजकारण

मुदखेड तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी दत्तू देशमुख वाडीकर तर शहराध्यक्षपदी रामसिंग चव्हाण यांची निवड

 

मुदखेड. तालुका (प्रतिनिधी मोहम्मद हकीम) मुदखेड भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी वाडी मुक्तापूर येथील कार्य कुशल सरपंच प्रतिनिधी दत्तु देशमुख वाडीकर तर शहर अध्यक्ष पदी युवा नेते रामसिं चव्हाण यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. संघटन पर्व मोहीमेत हि नव्यानां संधी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आ. श्रीजया ताई चव्हाण माजी आ. अमिताताई चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून दोन्ही मंडळ अध्यक्ष सर्वपरिचीत आहेत.

मुदखेड शहरातील उमरी चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा भाजपाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, यांनी केली यावेळी मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव पाटील शिंदे, नागेलीकर भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रविण गायकवाड, सभापती संजय राव देशमुख लहान कर किशोर स्वामी शामराव पाटील टेकाळे भीमराव पाटील कल्याण गांधीजी पाटील पवार, मारोती पाटील शंख तीर्थकर विनोद पाटील चिंचाळकर,

माजी नगराध्यक्ष सुनिल शेटे, पंडितराव चव्हाण अजय चव्हाण पत्रकार मनोज कमटे, न पचे माजी उपाध्यक्ष माधव पाटील कदम उद्धवराव पाटील पवार मारोती पाटील जाधव बालाजी पाटील जाधव गोविंदराव पाटील बळी पाटील ढगे रणजीत पाटील डोलारकर संजय सोनटके, संजय कोलते, कान्होबा बिसमिले, बालासाहेब देशमुख चिकाळेकर बंडू भंडारे कोमल जयस्वाल आदी सह अन्य शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

फटाक्याच्या आतिश बाजित नूतन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले .
राजाचे माजी मुख्यमंत्री लोकनेते खा. अशोकराव चव्हाण आमदार ऍडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण माजी आमदार अमीताताई ताई चव्हाण यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे संघटन पुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन गतीने मजबूत करून अशी प्रतिक्रिया भाजपाचे नूतन तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर व शहराध्यक्ष युवा नेते रामसिंग चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार मारोती पाटील शंखतीर्थकर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शहर व तालुक्यातील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांचे प्रामुख्याने उपस्थित होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *