राजकारण
लोहा : तालुकास्तरीय सरपंच पद आरक्षण सोडत कार्यक्रमात ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
लोहा (ता.लोहा) – तहसील कार्यालयात तालुकास्तरीय ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सरपंच पद आरक्षणाच्या प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, गटविकास अधिकारी आडेराघो, तलाठी परशुराम जाधव आदी अधिकारी मंचावर उपस्थित होते. सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत पारदर्शक पद्धतीने माहिती दिली गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे छायाचित्र विनोद महाबळे यांनी घेतले.



