मिशन उडान’ने दिले हजारोंना नवे पंख!
नांदेड पोलीस दलाच्या उपक्रमात 3502 बेरोजगारांना रोजगाराची संधी, दिव्यांगांनाही नवा आशावाद

नांदेड | प्रतिनिधी : ‘पोलीस म्हणजे फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कार्य करणारे नसून, समाजाचा खरा भागही असतो’ – हे सिद्ध केले आहे नांदेड पोलीस दलाने!
मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या “मिशन सहयोग” अंतर्गत राबवण्यात आलेल्या ‘मिशन उडान’ या अभिनव उपक्रमातील भव्य रोजगार मेळावा दिनांक 03 मे 2025 रोजी पोलीस मुख्यालय, नांदेड येथे संपन्न झाला.
या रोजगार मेळाव्यात…
✅ 9015 युवक-युवतींची नोंदणी
✅ 6038 जणांची प्रत्यक्ष उपस्थिती
✅ 3502 जणांना रोजगाराच्या संधीसाठी ऑफर लेटर
✅ 97 नामांकित कंपन्यांचा सहभाग
✅ 03 दिव्यांग उमेदवारांनाही रोजगाराची संधी

🙌 दिव्यांगांसाठीही उमेद
दोन मूकबधीर आणि एक शारीरिकदृष्ट्या अंशतः अपंग उमेदवारांना युवा शक्ती फाऊंडेशन आणि 24/7 या कंपन्यांनी नोकरी दिली. सामाजिक समावेशकतेचा हा खरा आदर्श!
☀️ चोख आयोजन : सावली, थंड पाणी, स्वादिष्ट जेवण!
उन्हाच्या तडाख्यातही उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी
🧊 थंड पाणी,
🎪 मोठे टेंट,
🍱 स्वादिष्ट अल्पोपहार व जेवण यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

👏 मान्यवरांची उपस्थिती
या भव्य मेळाव्याला विविध राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये आमदार, खासदार, आयुक्त अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता.
📞 तक्रार? पारदर्शकतेची हमी!
संपूर्ण मेळावा पारदर्शकपणे पार पडला असून, कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास 8308274100 / 7774089100 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
🌟 ‘मिशन उडान’ केवळ रोजगार पुरवणारा नव्हे, तर नांदेडच्या हजारो तरुणांचे भविष्य घडवणारा उपक्रम ठरतोय!



