शिक्षण

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच; नांदेड जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात

नांदेड | प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नांदेड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये इयत्ता 11 वीचे प्रवेश हे शहरी व ग्रामीण भागांसाठी फक्त केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. यासंदर्भात शासनाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली असून, नांदेड जिल्ह्यातही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

या प्रवेश प्रक्रियेची माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक व मार्गदर्शक सूचनांसह नियमितपणे प्रसिद्ध होत राहील. अडचणी आल्यास तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी कार्यालयात मदत कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार आहेत. याची स्वतंत्र माहिती लवकरच दिली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.


महानगरपालिकांनंतर आता सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रवेश

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून ११ वीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. आता हीच प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे.


🏫 उच्च माध्यमिक विद्यालयांची तयारी कशी असावी?

  • सर्व शाळांनी शासनाच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक

  • नोंदणीपूर्वी आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी (शासन मान्यता आदेश, विषय मान्यता, शाखा आदेश, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, बँक तपशील इ.)

  • विद्यालयात इंटरनेटची सुविधा, पूर्णवेळ यंत्रणा व मार्गदर्शन व्यवस्था अनिवार्य

  • माहिती पुस्तिका व वेळापत्रक विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून द्यावीत

  • शाळांनी शक्यतो विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय करावी

  • चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरू नये, अन्यथा जबाबदारी प्राचार्य व व्यवस्थापनावर राहील

⚠️ ऑफलाईन प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाहीत. अशा प्रवेशांवरील विद्यार्थ्यांना १२ वी परीक्षेस बसता येणार नाही.


🎓 विद्यार्थ्यांनी काय करावे?

  • १० वीचा निकाल लागण्याआधी व नंतर २ वेळा नोंदणी करावी लागेल

  • फक्त एक ऑनलाईन अर्ज (दोन भागांत) भरायचा आहे

  • अर्जासाठी: गुणपत्रक, टीसी, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर, आधार, फोटो इत्यादी तयार ठेवावेत

  • विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा १० वीच्या शाळेतून अर्ज भरू शकतात

  • भाग १ निकालाआधी, भाग २ निकालानंतर व पसंतीक्रमासाठी भरायचा आहे


🔁 प्रवेश प्रक्रियेतील फेर्या:

  • एकूण ४ फेर्या होतील

  • पहिली “शून्य फेरी” केवळ भाग-१ भरण्यासाठी

  • नंतरच्या फेर्यांमध्ये भाग-२ भरून पसंतीक्रम व कोटा प्रवेश करता येईल

  • सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य


💰 शालेय शुल्क:

  • शासकीय नियमांनुसार शुल्क आकारले जाईल

  • विना-अनुदानित व स्वयं-अर्थसहायित महाविद्यालयांचे शुल्क संस्थाच ठरवेल

  • महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम २०११ नुसार शुल्क निश्चित केले जाईल


🆘 मदत कक्ष लवकरच सुरू होणार

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुका व जिल्हा स्तरावर लवकरच मदत कक्ष सुरू करण्यात येतील. याबाबतची अधिकृत माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.


सर्व पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनांनी ही माहिती गांभीर्याने घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *