महाराष्ट्रा

नांदेड पोलिस दलाची दहशतवादविरोधी मॉकड्रिल – नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांपासून दूर राहावे!

नांदेड, ७ मे २०२५: दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच नागपूर, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर यांसारख्या ठिकाणी धार्मिक वादामुळे उसळलेल्या जातीय दंग्यांनंतर, नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नांदेड पोलिस दलाने दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिबंधासाठी मॉकड्रिल (कवायत) आयोजित केली.

ही कवायत मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार दि. ७ मे २०२५ रोजी सकाळी ११.१५ ते १२.३० या वेळेत नांदेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर पार पडली.

कवायतीत सहभागी झालेले पथक व यंत्रणा: जलद प्रतिसाद पथक (QRT): १ अधिकारी, ३२ अंमलदार बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS): २ अधिकारी, ४ अंमलदार, १ श्वान ‘सिबा’ दहशतवादविरोधी पथक (ATS): १ अधिकारी, २ अंमलदार दहशतवादविरोधी शाखा (ATS Branch): १ अधिकारी, ३ अंमलदार रेल्वे सुरक्षा बल (RPF): १ अधिकारी, ७ जवान गणवेशधारी रेल्वे पोलिस (GRP): २ अधिकारी, १० अंमलदार गुप्तचर विभाग (SIB, CIB): संबंधित अधिकारी
अग्निशमन दल: १ अधिकारी, ४ जवान वैद्यकीय पथक: १ अधिकारी, ४ कर्मचारी

या सर्व यंत्रणांनी समन्वयाने दंगा नियंत्रण व दहशतवाद प्रतिबंधात्मक हल्ल्याचा रंगीत सराव केला. यातून पोलिस दलाची सज्जता आणि कृतीक्षमतेचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन: पोलीस अधीक्षक मा. श्री अभिनाश कुमार यांनी नागरिकांना दिलेले आवाहन:

“नांदेड जिल्हा पोलीस दल दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी पूर्णपणे सज्ज व सतर्क आहे. कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. एखादी संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ मोबाईल क्रमांक 9975629251 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी.” या कवायतीमुळे पोलिस दलाची कार्यक्षमता वाढेल तसेच जनतेमध्ये सुरक्षा व विश्वास वाढण्यास मदत होईल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *