स्पोर्ट्स

खेलो इंडिया युवा धनुर्वीधा स्पर्धेत ज्ञानेश चरलेचा सुवर्ण लक्ष्यवेध….

बिहार भागलपूर येथे चालू असलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा गेम स्पर्धेमध्ये नांदेडच्या ज्ञानेश बालाजी चेरलेने धनुर्विदेत रिकव्हर प्रकारात मिक्स गटामध्ये सुवर्ण लक्ष्यवेध करीत महाराष्ट्राच्या पदकतालिकेत सुवर्णपदकाची भर घातली .
अगदी लहान वयातच मोठा भाऊ मार्तंड च्या पावलावर पाऊल ठेवून आई-वडिलांचे प्रेरणांनी नांदेड जिल्ह्याच्या सचिव दत्त प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेशने यावर्षी झालेल्या शालेय स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात खेळत एक रोपटेपदक दोन कांस्यपदक मिळवीत बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया युग गेम्स स्पर्धेत आपले स्थान कायम केले सदरील स्पर्धा ही भारतात ऑलिंपिक दर्जाच्या सोयी सुविधा व कमी वयात उच्च दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव देते .

स्पर्धेत देशातील केवळ १६ मुले व १६ मुलीच सहभागी होतात .या स्पर्धेत ज्ञानेशने 720 पैकी 651 गुण मिळतील तिसरे स्थान तर महाराष्ट्राच्या मुलांपैकी प्रथम स्थान मिळविले मुलींमध्ये शर्वरी शेंडे हिने 667 गुणून घेत प्रथम स्थान मिळविले ज्ञानेश्वरीच्या मिक्स टीमने आंध्र प्रदेश व हरियाणा सारख्या बलाढ्य टीमला सहजपणे नववीत सुवर्णपदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले ज्ञानेशने मागील दोन वर्षात सीनियर ज्युनिअर व शालेय स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकवले आहे तर 2023 24 ला युथ एशियन स्पर्धेतही कॅडेट गटात तैवान येथे त्यांने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले . त्याच्या या यशाच कौतुक करीत भारतीय खेळ प्राधिकरणाने संभाजीनगर येथील साई केंद्रात त्याची निवड केली व त्यास खेलो इंडिया स्कॉलरशिप देऊ केली . राष्ट्रीय स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला नुकतेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते दोन लाख पन्नास हजार रुपयाची साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले आहे .

त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे जिल्हा संघटना प्रशिक्षीका वृषाली पाटील जोगदंड , आई धनरेखा चेरले , वडील बालाजी चेरले कार्याध्यक्ष डॉ. हंसराज वैध , आ . भिमराव केराम , मुख्याध्यापक कृष्णा नेमानिवार , मुकुंदराव तिरमनवार , गोवर्धन मुंडे , नरसिंग यड्रलवार , साई नालीवार , जिल्हा संघटना कोषाध्यक्ष सुरेश तमलूरकर , सदस्य राष्ट्रपाल नरवाडे , पोलीस निरीक्षक तानाजी चेरले ,नांदेड तालूका अध्यक्ष श्रीनिवास भुस्सेवार , उपाध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर , मालू कांबळे , शिवाजी पुजरवाड , माधव दुयेवाड , संजय चव्हाण , ॲड . अरुण फाजगे , सतीशकुमार जाधव , विष्णू जगळपुरे , संतोष कनकावार , चंद्रप्रकाश होनवडजकर , शिवाजी अंबुलगेकर , ऑलम्पिक संघटना उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले , कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी , प्रलोभ कुलकर्णी , सहसचिव डॉ . राहुल वाघमारे , डॉ . राजेश जांभळे , बालाजी जोगदंड , विष्णू जगळपूरे यांच्यासह अनेकानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *