हेल्थ

तीव्र उन्हाळ्यात आरोग्य सांभाळा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

 

नांदेड:- एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला लागले आहेत. या महिन्यात तापमानाचा पारा 42 अंशाच्या घरात जाऊन भडकला. त्यामुळे तीव्र उन्हाचे तापमान लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा जिल्हा भरातील 83 आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जुन महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. या उष्माघातामुळे मृत्यूची संभावना असते. मार्च व एप्रिल महिन्या पासून व एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमान प्रचंड वाढ झाली आहे शहराचा पारा भडकला व ते 42° पर्यंत पोहोचवला आहे संपूर्ण जिल्हा उन्हाळ्यामुळे तापू लागला असून पुढील कालावधीत पारा अधिक तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेतली आहे. उस्माघात झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. अंतर्गत जिल्हाभरातील आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले. सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय एकूण 16 आणि प्राथमिक आरोग्य केंद्र 65, महिला रुग्णालय जिल्हा रुग्णालय असे एकूण 83 उष्माघात कक्ष सज्ज आहेत.

या उष्माघात कक्षात आरोग्य विभाग अंतर्गत एसी, कुलर, बर्फाच्या सुविधेसह आवश्यक औषध साठाही उपलब्ध करण्यात आला आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा आहे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभाग दक्ष असून उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर सर यांनी केले आहे.

सर्व आरोग्य संस्थेत औषधोपचार व सोयी सुविधा उपलब्ध असून डॉक्टर 24 तास कार्यरत आहेत. जिल्ह्यात उष्माघात त्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही अद्याप अशी काही नोंद नाही. आतापर्यंत जिल्हाभरात काही ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णावर उपचार केला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

उष्माघाताची लक्षणे
थकवा येणे, ताप येणे, तोंडाची त्वचा कोरडी पडणे,भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, पोट यात वेदना किंवा पेठके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेन होणे, अस्वस्थता, बेशुद्धपणा, सतत झोप येणे,चिडचिड होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, शुष्क डोळे अशी लक्षणे आढळून आल्यास उष्माघात झाल्याचे स्पष्ट होते व त्वरित आरोग्य संस्थेस संपर्क साधावा असे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *