शहर

नांदेड शहरात नो पार्किंग ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर १६ मेपासून टोईंगची कार्यवाही सुरू

नांदेड, १5 मे २०२५ – नांदेड शहर वाहतूक शाखा, वजिराबाद आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मे २०२५ पासून नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर टोईंगद्वारे कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल्स, शाळा, बाजारपेठा अशा ठिकाणी वाहनधारकांकडून बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत, त्यामुळे रस्ते अरुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर, नांदेड-वाघाळा महापालिकेने टोईंग वाहने व कर्मचारी पुरवले असून, वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांच्या वतीने नो पार्किंग व अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

शहर पोलिस प्रशासनाने सर्व वाहनधारकांना सूचित केले आहे की, त्यांनी आपली वाहने नियमित आणि परवानगी असलेल्या ठिकाणीच पार्क करावीत. जर वाहन नो पार्किंग क्षेत्रात किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणी आढळले, तर टोईंग करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *