शहर

नांदेड : बनजारा हिल्स प्लॉटिंग योजनेचा लकी ड्रॉ उत्साहात संपन्न

जवाहर नगर, हैदराबाद रोडवरील प्लॉट धारकांची मोठी उपस्थिती

 

नांदेड प्रतिनिधी : नांदेडच्या जवाहर नगर, हैदराबाद रोड परिसरातील बनजारा हिल्स या नावाजलेल्या प्रकल्पात मागील वर्षी १८ महिन्यांच्या सुलभ हफ्त्यांमध्ये प्लॉट विक्री योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला एक लकी ड्रॉ आयोजित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर काल बनजारा हिल्सच्या वतीने आर. के. फंक्शन हॉल, नांदेड येथे लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्लॉट धारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

बनजारा हिल्सच्या मालकांनी उपस्थितांचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आणि भविष्यात देखील अशाच पारदर्शक व ग्राहकहिताच्या योजना आणण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमात निवड झालेल्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले आणि योजनेतील सहभागामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

बनजारा हिल्स प्रकल्प आता नांदेडमधील विश्वसनीय रिअल इस्टेट योजनांपैकी एक म्हणून नावारूपाला येत आहे. या योजनेच्या यशामागे नागरिकांचा विश्वास आणि व्यवस्थापनाची पारदर्शकता हाच मुख्य आधार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *