बेरोजगार दिव्यांगाचे पाऊल जिल्हा परिषद च्या पायऱ्याला…….
बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी......

नांदेड प्रतिनिधी / मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत विविध कर्मचारी व शिक्षकांच्या बदल्या झाल्या या बदल्यामध्ये दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जोडले आहे याबाबत हे प्रमाणपत्र त्वरित बेरोजगार दिव्याग कल्याणकृती संघर्ष समितीकडे द्यावे व बोगस दिव्यांगावर कार्यवाही करावी या मागणीसाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,
सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध पदावर अनेक कर्मचारी अधिकारी आहेत त्याचबरोबर शिक्षकही आहेत अनेक जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केली आहे त्याचबरोबर बदल्यामध्येही बोगस दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे, त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे, मराठवाड्यातील बीड व धाराशिव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कर्मचारी व शिक्षकांचे मिळून आले त्यावरून नांदेड जिल्ह्यातही शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बोगस प्रमाणपत्र असल्याची शंका येते,
त्यावरून जिल्हा परिषद प्रशासनाने या तक्रारीचे गांभीर्य घेऊन बोगस असलेल्या दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी बेरोजगार दिव्याग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे, सर्वच बदली झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत संघटनेला द्यावी व खरे दिव्यांग आहेत का याची चौकशी करावी या मागणीसाठी दिव्यांगाच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीवर संस्थापक अध्यक्ष राहुल सिताराम साळवे,उपाध्यक्ष संजय नंदू दुलधाणी,
सचिव अब्दुल माजीद शेख चांद, साहेबराव कदम, महिला अध्यक्षा भाग्यश्री नागेश्वर,राजू इराबतीन, नागनाथ कामजळगे, शंकर गिमेकार यांनी निवेदन देऊन केली आहे सर्वच दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांचे प्रमाणपत्र द्यावे बोगसवर त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही आपल्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनामध्ये संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे



