महाराष्ट्रा

एप्रिल महिन्यात नांदेड विभागातील रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत 23480 अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही

रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या 09 तिकीट तपासणी मोहिमेत 23480 अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक , श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक-I आणि श्री एन. सुब्बा राव , सहायक वाणिज्य व्यवस्थापक-II यांनी या तिकीट तपासणी मोहिमेत महत्वाचा सहभाग घेतला.

या तपासणीत मोहिमेत विविध ठिकाणी आणि विविध रेल्वे गाड्यांमध्ये छोट्या छोट्या टीम बनवून धाडी टाकण्यात आल्या, यामुळे अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करणे सोपे झाले. नांदेड विभागातील तिकीट तपासनीस, वाणिज्य निरीक्षक आणि वाणिज्य कार्यालयातील कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला आणि तिकीट तपासणीच्या कामात मदत केली. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तपासणी दरम्यान, अनधिकृत प्रवासकरणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आणि त्यांना रेल्वे परिसरातून बाहेर करण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुखकर प्रवास सुनिश्चित झाला.

एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या 09 तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 23480 विनातिकीट / अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली ज्यात जवळपास 1 कोटी 36 लाख रुपये महसूल प्राप्त झाला.

श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि त्यांनी योग्य तिकीट घेवूनच रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करावा आणि दंडात्मक कार्यवाही टाळावी. तिकीट तपासणी मोहिम श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही दंडात्मक कारवाई रेल्वे प्रवाश्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *