पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवाद केले न
नांदेड – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई जोगदंड, माजी जि. प. सभापती शिवराज पाटील होटाळकर, प्रदेश सचिव सुनील नानवटे, उदय चव्हाण, कन्हैया कदम, प्रतिक देमनगुंडे, बालाजी शेळके, प्रविण घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख करून सामाजिक आणि जनसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. (छायाचित्र – ज्ञानेश्वर सुनेगावकर)



