देश विदेश

हजूर साहिब नांदेड ते फिरोजपूर (पंजाब) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु होणार

 

उत्तर रेल्वे ने गाडी क्रमांक 14622/14621 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्याचे घोषित केले आहे. हि गाडी पुढील वेळापत्रकानुसार दिलेल्या मार्गाने धावेल –

01. गाडी संख्या 14622 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस :

हि गाडी फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथून दिनांक 13 जून 2025 रोजी शुक्रवार पासून दुपारी 13.25 वाजता सुटेल आणि फरीदकोट, कोट कपुरा जंक्शन, भटिंडा जंक्शन, मानसा, जाखल, धमतन साहिब, जिंद, रोहतक, बहादुरगड, शकूरबस्ती, दिल्ली-सफदरजंग, फरीदाबाद, मथुरा जं.,आग्रा कँट, ग्वाल्हेर,विरांगना लक्ष्मीबाई झाशी, बिना जं., विदिशा, भोपाळ, इटारसी जं., खांडवा, भुसावळ जं.,मनमाड जं., औरंगाबाद, जालना, सेलू, परभणी जं., पूर्णा जं. मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रविवार सकाळी 03:30 वाजता पोहोचेल.

02. गाडी संख्या 14621 हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन साप्ताहिक एक्स्प्रेस:

हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 15 जून 2025 रोजी रविवार पासून सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि पूर्णा जं., परभणी जं., सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड जं., भुसावळ जं., खांडवा, इटारसी जं., भोपाळ, विदिशा, बिना जं., विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा जं., फरीदाबाद, दिल्ली-सफदर जंग, शकूरबस्ती, बहादुरगड, रोहतक, धमतन साहिब, जिंद, जाखल, मानसा, भटिंडा जंक्शन, कोट कपुरा जंक्शन, फरीदकोट, मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवार सकाळी 04:30 वाजता पोहोचेल.

03. या साप्ताहिक गाडीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानाकुलीत, द्वितीय शय्या आणि जनरल असे 22 डब्बे असतील.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *