विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांचा औरंगाबाद व दौलताबाद स्थानकांवरील महत्वाच्या विकास कामांचा आढावा

श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), नांदेड विभाग यांनी दिनांक 20 जून 2025 रोजी औरंगाबाद व दौलताबाद रेल्वे स्थानकांवर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा व ऑपरेशनल कामांची पाहणी केली.
आपल्या तपासणी दौऱ्यात श्री कामले यांनी प्रथम औरंगाबाद येथील पिटलाईन च्या कार्याची पाहणी केली, त्या नंतर श्री कामले यांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशन च्या नवीन इमारत च्या उत्तर व दक्षिण बाजूची कामे व प्रवासी सुविधा सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला.
यानंतर श्री कामले यांनी दौलताबाद स्थानकाचा दौरा केल्या. ज्यात दौलताबाद येथे नवीन मालधक्का उभारणीसाठी प्रस्तावित जागे ची पाहणी केली.
यानंतर दौलताबाद येथील कॉनकॉर सायडिंग (CONCOR siding) येथील कंटेनर मालवाहतुकीसाठी आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात पुढे त्यांनी दौलताबाद येथील लष्करी सायडिंग (Military siding) ची तपासणी केली. यात लष्करी विभागासाठी असलेल्या लॉजिस्टिक तयारीचा आढावा घेण्यात आला.
या दौऱ्याद्वारे औरंगाबाद आणि दौलताबाद रेल्वे स्थानकांवरील विविध सुधारणा, मालवाहतूक क्षमता वाढवणे व प्रवासी सेवा अधिक चांगल्या करण्याचा विभागाचा प्रयत्न अधोरेखित होतो.
या पाहणी दौऱ्यात श्री प्रदीप कामले यांच्या सोबत डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, श्री सुजित कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता / समन्वय, श्री प्रजापत, उप मुख्य अभियंता / बांधकाम हे अधिकारी उपस्थित होते.



