मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार – वेळापत्रक आणि संभाव्य तिकीट दर जाहीर

नांदेड | प्रतिनिधी:
मराठवाड्याच्या प्रगतीला चालना देणारी वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच नांदेड-मुंबई मार्गावर धावणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वेगवान प्रवासासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या या सेवेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
वेळापत्रक काय असेल?
नांदेडहून प्रस्थान: पहाटे 5:00 वाजता, परभणी: सकाळी 5:40 वाजता
जालना: सकाळी 7:20 वाजता, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सकाळी 8:15 वाजता, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT): दुपारी 2:25 वाजता
परतीचा प्रवास: CSMT वरून निघणे: दुपारी 1:10 वाजता, नांदेडमध्ये आगमन: रात्री 10:50 वाजता
ही वंदे भारत एक्सप्रेस परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
तिकीट दर किती असेल?
रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत तिकीट दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार अंदाजे दर पुढीलप्रमाणे असू शकतो:
एसी चेअर कार: ₹1,750, एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार: ₹3,300
तथापि, याबाबतची अंतिम आणि अधिकृत माहिती रेल्वे विभागाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
ही सेवा सुरू झाल्यास मराठवाडा आणि मुंबई यांच्यातील अंतर केवळ कमी होणार नाही, तर प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.



