शहर

प्रभाग रचना बदलासंदर्भात नागरिकांचा पुढाकार – प्रभाग क्र. १४ मध्ये सर्व धर्म-जमातींच्या भागांचा समावेश करण्याची मागणी

 

नांदेड, ७ जून २५ – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ च्या रचनेत विविध जाती व धर्मीय भागांचा समावेश करून सर्वसमावेशक लोकप्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदेड दक्षिणचे उपजिल्हा संघटक गजानन सहिबराव हारकरे पाटील यांनी एक औपचारिक निवेदन सादर करून मागणी केली आहे.

निवेदनात सन २०२५ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये शनिदेव गल्ली, विणकर कॉलोनी, सूळ टेकडी, लिंबोणी नगर, प्रीती नगर, पठाण गल्ली, पंचवाडा, भोपळे हॉस्पिटल परिसर, मिलंद नगर, मंडई टेकडा व परिसर, किल्ला रोड, घसू गल्ली अशा विविध जाती आणि धर्मीय लोकवस्ती असलेल्या भागांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गजानन पाटील यांनी स्पष्ट केलं की, सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रभाग रचनेत समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे या भागातील लोकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली.

ही मागणी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे प्रतिलिपीसह सादर करण्यात आली असून स्थानिक नागरीकांतून या पुढाकाराचे स्वागत होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसमावेशकता टिकवण्यासाठी नागरिकांचा असा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *