निष्ठावंतांनो आता हलवा ‘गाजर’..! अर्धापूर तालुक्यात उपऱ्यांच्या हाती ‘कमळ’ प्रामाणिक निष्ठावंतांना डावळले !

अर्धापूर:- उध्दव सरोदे – अर्धापूर तालुका भाजपाच्या नव्या कार्यकारणीत वर्षानुवर्षे शेकडो कार्यकर्ते भाजपाचे प्रामाणिक काम करणाऱ्या निष्ठावंत बालाजी मरकुंदे, राजाभाऊ राजेंवार,राजु धात्रक, बाबुराव लंगडे,प्रल्हाद माटे,प्रल्हाद कापसे,नेहरू पाटील कदम,बालाजी स्वामी,गजानन मुसळे,बाबाराव मुसळे,अमोल कपाटे,अशोक बुटले, बारसे मामा,प्रभू कपाटे,बालाजी गंधनवाड,माधव बारसे,सुधाकर कदम,प्रल्हाद कापसे,दत्तराव कदम, साई बारसे,उद्धवराव जाधव,मुंजाजी राजगोरे,अर्जुन केदारे व ईतर बऱ्याच शा निष्ठावंत शेकडो तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना स्थान मिळाले नाही.नव्या तालुका कार्यकारिणीत जुने नवे असा किमान पन्नास पन्नास टक्के तरी समतोल साधायला हवा होता.पण तसे न होता ज्यांच्या विरुद्ध वर्षानुवर्षे लढलोत ते आज पक्षाचे ‘मालक’ झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पुढे मागे फिरणारे ‘चुलबूले’ कार्यकर्ते आता पदाधिकारी होत आहेत.
अशावेळी निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी देणे ही एक फार मोठी दुर्दैवी बाब आहे.”भोकर मतदारसंघात व नांदेड जिल्ह्यात भाजपाचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे अर्धापूर तालुका संघटन निवडीमध्येही बहुतांश निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या हातात गाजर दिले गेले असून उपऱ्यांच्या हातात कमळ दिल्याने पक्षांतर्गत धुसपूस ऐकावयास मिळत आहे. अर्धापूर तालुक्यातील उपऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना ‘बालाजी’ पावला असून अनेकांची कार्यकारिणीमध्ये वर्णी लागली आहे.नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या अनेक जुन्या भाजप कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने ‘श्रीं’च्या इच्छेपुढे कुणाचे चालणार अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे आता निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना उचलणे आणि ‘कमळा’च्या पोलचिट वाटणे व सतरंज्या उचलणे इतकेच काम बाकी राहीले आहे.
गेल्या दशकभरापेक्षाही अधिक वर्षांपासून काम करणाऱ्या अनेक ‘सुचिन’ कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये निवड होऊन ‘कल्याण’ होईल असे वाटत असतांना पक्षाने किंवा पक्षात आलेले एकाधिकारशाहीपणा व मनमानीपणा गाजवणारे,स्वतःला मालक समजणाऱ्यांनी हाती गाजर’ दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये ‘शोक’ कळा पसरली आहे.नव्या निवडी संदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करता येत नसल्याने निष्ठावंतांचे अवघड जागचे दुखणे बनले आहे.त्यामुळे निष्ठावंतांनो आता हलवा ‘गाजर’ अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

