महाराष्ट्रा

शेतकरी व कुरेशी बिरादरीच्या पाठीशी सर्व समाज घटकांनी उभे रहावे -इस्लाह-ए-मआशराचे आवाहन

 

नांदेडः आज नांदेड येथे कुरैशी बिरादरीच्या वतीने सुरु असलेल्या राज्यस्तरीय बंद या आंदोलनास इस्लाह-ए-मआशरा समितीने पाठिंबा जाहीर केला.

या वेळी इस्लाह-ए-मआशराचे कन्व्हेनर अ‍ॅड. रहमान सिद्दीकी, फारुक अहमद सहीत सर्व सदस्यांनी स्पष्ट केले की,
“गोरगरीब मजुरी करणाऱ्या कुटुंबांवर या निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येऊ नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बिरादरीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यादीतील प्रत्येक कुटुंबापर्यंत राशन किट पोहचवले जाईल.”

बैठकीत खालील गंभीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली:
1. कायदेशीर बंदी नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर गोरक्षकांच्या नावाखाली होणारे हल्ले
2. शासन-प्रशासनाच्या स्तरावर स्लॉटर हाऊस परवानगी, पोल्युशन विभाग व प्राण्यांच्या क्रूरतेविरुद्धचे कायदे वापरून होणारा छळ
3. बीफ बॅनचा अंमल, वाहतूक, हॉटेल उद्योग आणि मजूरवर्गावर होणारा परिणाम
4. पोलीस विभागाकडून होणारा राजकीय दबाव आणि तपास प्रक्रियेतील पारदर्शकता
या सर्व प्रश्नांवर कायद्याच्या चौकटीत राहून ठोस भूमिका घेण्यात यावी.

इस्लाह-ए-मआशरा समितीने स्पष्ट केले की, या संघर्षाला आम्ही सर्वतोपरी साथ देऊ आणि कोणत्याही निरपराध गोरगरीब कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही.
इस्लाह-ए-मआशराच्या वतीने कुरेशी बिरादरीचे नेते खलील कुरेशी, अजीज कुरेशी, इक्बाल कुरेशी, फारुक कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला या वेळी
उपस्थित इस्लाह-ए-मआशराचे ज्येष्ठ नेते अल्ताफ सानी, इंजिनिअर प्रशांत इंगोले,?रहमत पहलवान, ज्येष्ठ पत्रकार शाम कांबळे, करामतुल्ला खान उर्फ कम्मु सेठ, माजी नगरसेवक सईद खान,ॲड शेख बिलाल, प्रा.विनायक गजभारे, महंमद कासीम सहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *