शहर

अमृत 2.0 योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ पाकीजा नगरमध्ये

 

नांदेड | आज प्रभाग क्रमांक 12 येथील पाकीजा नगर भागात अमृत 2.0 योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ नांदेड शहराचे माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर प्रकल्पासाठी गुत्तेदारांशी सातत्याने पाठपुरावा करून अखेर हे काम मार्गी लावण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामाच्या सुरुवातीने परिसरातील सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी प्रभागातील सर्व नागरिकांनी माजी उपमहापौर अब्दुल गफार तसेच स्थानिक नगरसेवकांचे आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी मोहसीन शेख, अफजल भाई, चांद भाई, सद्दाम भाई, नासिर भाई, रशीद कुरेशी यांची उपस्थिती लक्षणीय होती.

तसेच, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे, शहर अभियंता सुमन पाटील, तसेच ज्युनिअर इंजिनिअर जककी सर यांचे देखील माजी उपमहापौर अब्दुल गफार यांनी विशेष आभार मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *