ब्रेकिंग न्यूज: पाथरी (परभणी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी काँग्रेसच्या वाटेवर!

परभणी, दि. ६ ऑगस्ट – परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, बाबा जानी दुर्रानी पक्षांतराच्या तयारीत असून, अखेर त्यांनी काँग्रेसचा हात धरण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या प्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता आहे.
बाबा जानी दुर्रानी हे पाथरी परिसरात लोकप्रिय आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस नेत्यांशी चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत मोठा पक्ष प्रवेश सोहळा पार पडेल, अशी माहिती आहे.राजकारणात नवा भूकंप घडवणारी ही घडामोड भविष्यात अनेक हालचालींना कारणीभूत ठरणार, असे जाणकारांचे मत आहे.



