स्पोर्ट्स
नांदेडचा अभिमान! गणेश भंडारेची महाराष्ट्र मुलांच्या संभाव्य संघात निवड

नांदेड : नांदेडचा होतकरू खेळाडू गणेश भंडारे याने क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र मुलांच्या संभाव्य संघासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत त्याने आपले कौशल्य सादर करत निवड पक्की केली.
गणेशच्या या यशामुळे नांदेड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळाली असून स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योग्य परिश्रम, चिकाटी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे गणेशने हे यश मिळवले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
गणेश भंडारेच्या निवडीमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार व गावकऱ्यांमध्येही आनंदोत्सव साजरा होत आहे. आगामी स्पर्धेत तो राज्याचे प्रतिनिधित्व करणार असून नांदेडकरांचा त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.



