शहर

माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा

 

नांदेड – शहरातील जुन्या भागात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटे ४ वाजल्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वस्त्यांत पाणी शिरून गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हबीबीया कॉलनी, हमीदिया कॉलनी, उमर कॉलनी, रज्जाक कॉलनी, इकबाल नगर, पाकीजा नगर, हिलाल नगर आणि भावेश्वर नगर परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसले असून कुटुंबांना घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे.

या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच नांदेड लोकसभा खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व माजी महापौर तथा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. धोक्याच्या स्थितीत असलेल्या कुटुंबांना तातडीने पाकीजा फंक्शन हॉल येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

प्रशासनाला तात्काळ सूचित करून मदतकार्य वेगाने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रभावित भागांचा त्वरित सर्वेक्षण करून योग्य ती शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी विनंती खासदार व काँग्रेस नेत्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *