मराठवाडा

लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची काँग्रेसची मागणी

 

लोहा (ता. ३१ ऑगस्ट): लोहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे निवेदन तालुका काँग्रेसचे कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर व उपाध्यक्ष उत्तम महाबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या वेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, लोहा-कंधार काँग्रेस प्रभारी अनिलजी मोरे, शहराध्यक्ष सोनुभाऊ संगेवार, माजी नगरसेवक वसंत बापू पवार, बाबासाहेब बाबर, दत्ताभाऊ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रशासनाकडून नायब तहसीलदार अशोक मोकळे, गटविकास अधिकारी कुलकर्णी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, तलाठी विभुते, दिनेश तेलंग यांनीही उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र : विनोद महाबळे

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *