महाराष्ट्रा

डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगरात

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अंग असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात पार पडणार आहे.

सकाळी 10.30 वाजता** या अधिवेशनाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री मा. ना. संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री **मा. ना. अतुल सावे उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा. श्री. एस.एम. देशमुख साहेब भूषवणार असून पत्रकार परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या परिषदेसाठी डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल वाघमारे व त्यांची संपूर्ण टीम उत्साहाने तयारीत गुंतलेली आहे. तर तयारीसाठी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. अब्दुल कदीर, स.सो. खंडाळकर, मुंबई प्रतिनिधी सुनीलचंद्र वाघमारे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, उपाध्यक्ष महादेव जामनिक व ब्रह्मानंद चक्करवार विशेष प्रयत्नशील आहेत.

या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *