हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी च्या गंतव्य स्थानात बदल, हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाणार

प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी च्या चार फेऱ्या करण्याचे घोषित केले होते.
यात आता बदल करण्यात आला आहे. या विशेष गाड्या हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड दरम्यान धावतील. त्या पुढील प्रमाणे
1 ) हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस :
गाडी क्रमांक 07603 हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 22 आणि 29 सप्टेंबर, 2025 सोमवारी रात्री 23:45 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हि गाडी, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी 13.40 वाजता पोहोचेल.
2) लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड :
गाडी क्रमांक 07604 लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 सप्टेंबर 2025 मंगळवारी दुपारी 16:35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सुटेल आलेल्या मार्गानेच हजूर साहिब नांदेड येथे बुधवारी सकाळी 06.30 वाजता पोहोचेल.
या गाडीत जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे 22 डब्बे असतील.



