महाराष्ट्रा
नांदेड-पनवेल – नांदेड एक्सप्रेस ची एक फेरी रद्द

मध्य रेल्वे , मुंबई विभागातील कर्जत रेल्वे स्टेशन वर यार्ड रीमोडेलिंग चे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर याचा परिणाम झाला आहे, यामुळे नांदेड विभागातून धावणारी नांदेड-पनवेल नांदेड एक्सप्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे
1) दिनांक 11 ऑक्टोबर 2025 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 17614 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे
2) दिनांक 12 ऑक्टोबर 2025 ला पनवेल येथून सुटणारी गाडी संख्या 17613 पनवेल ते हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.



