मराठवाडा

परभणी जिल्ह्यातील शाळांना दिवाळी सुट्टी जाहीर

 

परभणी (जिल्हा प्रतिनिधी): सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शाळांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. प्राथमिक व माध्यमिक अशा सर्व माध्यमांतील आणि सर्व व्यवस्थापनाखालील शाळांना या सुट्ट्या लागू होणार आहेत.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. सविता बिरगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सुनील पोलास यांनी संयुक्त स्वाक्षरीने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार उन्हाळी व दिवाळी अशा दोन्ही प्रमुख सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

आदेशाप्रमाणे, उन्हाळी सुट्टी दिनांक २ मे २०२५ ते १५ जून २०२५ अशी एकूण ४४ दिवसांची देण्यात आली आहे. तसेच दिवाळीची दिर्घ सुट्टी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ पासून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील. यानंतर २ नोव्हेंबर हा रविवार असल्याने शाळा ३ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होतील.

याशिवाय मा. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या तीन अतिरिक्त सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे सन २०२५-२६ मध्ये एकूण ७३ दिवस सुट्ट्या व २४० कार्यदिवस निश्चित झाले आहेत.

या निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना पाठविण्यात आली असून, सर्व शाळांनी सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *