घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या जाळ्यात

नांदेड – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण 08 गुन्हे उघड झाले असून, आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, किंमत रुपये 7,28,339/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपी मंगल ज्ञानेश्वर चव्हाण (26), रा. गौतमनगर सांगवी नांदेड, ह.मु. पुणेगाव, जि. जालना, श्रीनिवास शिवाजी चव्हाण (26), रा. सोनारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड, प्रताप गब्बरसिंग राठोड (20), रा. सोनारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड
जप्त मुद्देमाल सोन्याचे दागिने – 61 ग्रॅम, चांदीचे दागिने – 270 ग्रॅम. एकूण किंमत ₹7,28,339/- (सात लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये)
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत विशेष मोहिमेचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.
दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सपोनि रवि वाहुळे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर चिखलवाडी परिसरात छापा टाकण्यात आला. छाप्यात वरील तिघे इसम सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सापडले. चौकशीत त्यांनी जामगा शिवनी, कोलंबी, इकळीमोर, नायगाव, कुंडलवाडी, बारड, लिंबगाव व देगलुर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली.
सदर आरोपींना मुद्देमालासह पोलीस ठाणे लोहा यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



