परभणी जिल्ह्यातील मागील चोवीस तासांत अतिवृष्टी…?
परभणीच्या २० मंडळांत अतिवृष्टीची नोंद....!

परभणी जिल्ह्यात मागील २४ तासांत परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली असून एकूण २० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शेतजमिनींवर पाणी साचल्याने शेती पिकांच्या मोठ्याप्रमाणात नुकसानीची भीती व्यक्त होत आहे
परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील दैठणा – ७९.०० मि.मी., पिंगळी – ६५.७५ मि.मी., गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव – १४३.०० मि.मी., गंगाखेड – १०६.२५ मि.मी.,महातपुरी – ९१.५० मि.मी., माखणी – ८२.२५ मि.मी.,पिंपळदरी – १११.२५ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पुर्णा – ७५.०० मि.मी., ताडकळस – ९७.७५ मि.मी., लिमाला – ७७.०० मि.मी.,कात्नेश्वर – ६७.५० मि.मी., चुडावा – ८५.७५ मि.मी., कावलगाव – ९९.७५ मि.मी., पालम तालुक्यातील पालम – १५३.२५ मि.मी., चाटोरी – १४३.०० मि.मी., बनवास – १३९.७५ मि.मी., पेठशिवनी – १११.५० मि.मी., रावराजूर – ११३.०० मि.मी., सोनपेठ तालुक्यातील आवलगाव – ६५.७५ मि.मी., वडगाव – ७६.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील बहुतेक भागात शेतशिवार पाण्याखाली गेले असून सोयाबीन, तूर, मूग, उडीद तसेच कापूस या हंगामी पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. काही ठिकाणी काढणीला आलेली पिके कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक प्रशासनाने नदी-नाल्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महसूल विभाग व कृषी अधिकारी पिकांचे पंचनामे करण्याची तयारी करत आहेत.
परभणी जिल्ह्यात सलग 24 तासांच्या पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, वाहतूक आणि बाजारपेठांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.



