माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी पूरग्रस्त भागांचे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले

नांदेड : आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ मधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त मनपा नांदेड तसेच संबंधित अधिकारी प्रत्यक्ष दौऱ्यावर आले होते.
या पाहणीदरम्यान शहराचे माजी महापौर अब्दुल सत्तार, मा. उपमहापौर अब्दुल गफ्फार व समाजसेवक अब्दुल मुख्तार सेट (बल्लू) यांनी नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर ठळकपणे मांडल्या. पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, शासनामार्फत आवश्यक ती आर्थिक मदत, अन्नधान्य व निवाऱ्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांना स्थलांतर, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यसेवेचा अभाव, शाळा व इतर शासकीय इमारतींमध्ये विस्थापितांचे राहणे यासंदर्भातील मुद्दे अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे पूरग्रस्तांना मदतीचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



