परभणीतील मोर्चात एक लाख समाज बांधव सहभागी होणार:

पत्रकार परिषदेमध्ये माहिती
एस. टी.प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उद्या मोर्चा
मराठवाड्यात हैद्राबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) सामावून घेऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहेत. या मोर्चात एक लाख बंजारा बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे हैदराबाद संस्थान गॅजेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि.07 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख समाज बांधवांचा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चात शिस्तीचे प्रदर्शन दिसणारा असून प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे.आमच्या प्रमुख आणि न्याय्य मागण्यांचा शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर आम्ही समाजबांधव मुंबईत धडकणार असून सरकारच्या दारात बसुन आरक्षण मिळवूनच थांबू, असे मत पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे
या मोर्चात परभणीसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिलां मोठ्या संख्येने सहभागी होणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बंजारा समाज संघर्ष समिती परभणी च्या वतीने केले आहे.



