परभणीत महापालिका कर्मचाऱ्यांचे आज पासुन कामबंद आंदोलन
महापालिका कर्मचार्यांचे पाच महिन्यांपासून वेतन थकले;
परभणी महानगरपालिकेतील कर्मचार्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असून या मनपा कर्मचार्यांनी 8 ऑक्टोंबर पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेला कर्मचार्यांच्या पगारासाठी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान अपुरे असल्यामुळे पगार वेळेवर देता येत नाहीत. या संदर्भात मनपाकडून शासनाकडे वाढीव अनुदानाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी कर्मचार्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मनपा प्रशासनात मनमानी कारभार सुरू असून काही कर्मचार्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली आहे,
तर अनेक कर्मचारी 20 वर्षांहून अधिक सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचित आहेत,आज दि 8 ऑक्टोबर पासून महानगरपालिका कार्यालयासमोर कामबंद धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत सर्व अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंधळे अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासेर बापू खान, के के भारसाकळे, विशाल उफाडे सह मनपा अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले आहे



